आपल्याला जर राष्ट्र व्हायचं असेल वा एकसंध भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर जात-निर्मूलनाची गरज आहे!
सुशिक्षितांमध्येही जातिव्यवस्थेचं समर्थन करणारा वर्ग निर्माण झाला आहे. सार्वजनिक व्यवहारांमध्ये जातीयता दिसत नसली तरी अदृश्य स्वरूपात दिसून येते. आजही जातीनिहाय वस्त्या, शहरी भागातील उपनगरं दिसून येतात. जातीव्यवस्था सामाजिक व आर्थिक न्याय देण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करते. जातविहीन व वर्गविहीन समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जातीविरुद्ध सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.......